6%waterfromkanherdamshouldbeblockedandwatershouldbegiventothecitizensoftheareathroughclosedpipeline:dr.demandofbharatpatankar

esahas.com

कण्हेर धरणातील सहा टक्के पाणी अडवून परिसरातील नागरिकांना बंद पाईपलाईनने पाणी द्यावे : डॉ. भारत पाटणकर यांची मागणी

कण्हेर, ता. सातारा येथील धरणातून वर उचलावयाचे सहा टक्के पाणी अडवून उताराच्या बंद पाईपलाईनने संबंधितांना देण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.